Type Here to Get Search Results !

अनिस सुंडके यांच्या प्रचारानिमित्त जंगी रॅली ; पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार...


अनिस सुंडके यांच्या प्रचारानिमित्त रॅली...

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके यांच्या प्रचारानिमित्त बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. क्वार्टर गेटपासून, जुना बाजार मार्गे कागदीपुरा येथून कसब्यातील धाकटा शेख सल्ला दर्ग्याच्या येथे रॅलीचा समारोप झाला.

रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग होता. ठिकठिकाणी नागरिकांनी फटाके वाजवून तसेच सुंडके यांचे स्वागत केले.

या वेळी सुंडके म्हणाले “आम्ही भाजपाची बी टीम आहोत, असा आरोप केला जातो. मात्र. भाजपा ही ए आणि काँग्रेस ही बी टीम आहे. आम्ही तर एकटे लढत आहोत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तीन-तीन पक्ष एकत्र लढत आहेत. आम्ही मात्र आमच्या मुस्लिम, दलित, ख्रिश्चन अशा अल्पसंख्यांक बांधवांसाठी एकटे लढत आहोत.’

दरम्यान, “धंगेकर यांच्या प्रचाराला राहुल गांधी येत आहेत. तर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराला नरेंद्र मोदी येत आहेत. आमच्या प्रचाराला खासदार असदुद्दीन ओवेसी येणार आहेत. दि. ७ मे रोजी त्यांच्या सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. सभेचे ठिकाण लवकरच निश्चित केले जाईल,’ असेही सुंडके यांनी सांगितले.

यावेळी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष फैय्याज शेख, रुहीनाज शेख, शाहिद शेख, मोबिन खान व आदी पदाधिकारी व विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments