Type Here to Get Search Results !

लोकसभा रणधुमाळीत अजित पवार गटाला धक्का...

लोकसभा रणधुमाळीत अजित पवार गटाला धक्का...

वडगांव : तळागाळातील लोकांशी नाळ जोडून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष सज्ज आहे, शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी तुतारीचा ललकार करून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या मावळ तालुका कामशेत शहरातील अनेक पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

मावळ तालुका उपाध्यक्षपदी संतोष गंगाराम राक्षे, मावळ तालुका लीगल सेल अध्यक्षपदी ॲड. विशाल वसंत गाढवे, कामशेत शहर अध्यक्षपदी संतोष रोहिदास वीर, युवक अध्यक्षपदी सुरज अंकुश पुरी, ओबीसी विभाग अध्यक्षपदी अभिजीत अमृता शिनगारे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्षपदी मोईनुद्दीन अल्लाउद्दिन खान, व्यापारी आघाडी अध्यक्षपदी धनराज ओसवाल यांची निवड मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, प्रभारी मावळ व पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले, मावळ अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष आफताब सय्यद, मा.उपसरपंच तानाजीभाऊ दाभाडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहतील असा मनोदय वक्त करण्यात आला.

या युवा कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती…
यावेळी करणशेट ओसवाल, व्या.अ.अध्यक्ष.विलासजी भटेवरा, आनंद टाटीया, रोहिदास वाळुंज, कोंडीबा रोकडे, रामभाऊ गाढवे, किशोर वाघवले, हभप योगेश चोपडे, पंकज भामरे, ग्रा.पं. सदस्य विजय दौंडे , ग्रा.पं. सदस्य संतोष काळे,ग्रा.पं. सदस्य परेश बरदाडे, संजय पडवकर, मा.सरपंच पोपट चव्हाण, राजू बेदमुथा, नरेश बेदमुथा, सूधीर वीर, अरविंद ओसवाल, तुषार पवार, किशोर ओव्हाळ, दिनेश गायकवाड, समीर ढमाले, गणेश राणे, शशिकांत लोळे, विष्णू ढमाले, किशोर मोदी, नरेंद्र गरुड, बबन दुडे, भरत जैन, कल्पेश बेदमुथा आदी युवा तरूण कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments