वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ.अन्वर शेख यांच्य प्रचारार्थ हडपसरमध्ये अँड.प्रकाश आंबेडकरांची भव्य जाहिर सभा...
पुणे :- शिरूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांची हडपसर येथे 5 मे ला भव्य जाहीर सभेचे आयोजन केले असल्याचे डॉ.अन्वर शेख यांनी जाहीर केले .
या सभेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार आहे .पुणे शाहर तसेच शिरूर मतदार संघातील शिरूर ,जुन्नर ,आंबेगाव ,राजगुरुनगर ,भोसरी ,हडपसर या भागातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते ,महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे .यावेळी आंबेडकर यांच्या सभेला प्रचंड असा प्रतिसाद मिळणार आहे .या सभेसाठी पुर्ण तयारी झाली असून उद्या वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने या सभेला उतरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
या सभेच्या नियोजनासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज कुमार ,पुणे शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी ,पुणे पश्चिम जिल्हाध्यक्ष कमलेश उकिरंडे तसेच हडपसर विभाग अध्यक्ष विश्वास गदादे यांनी सभेची तयारी पूर्ण केली आहे तर उद्याच्या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे .ही सभा सांयकाळी हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयाच्या पटांगणात उद्या सांयकाळी पाच वाजता पार पडणार आहे .
Post a Comment
0 Comments