पुणे पोलिसांना कुठून किती हप्ता मिळतोय - रविंद्र धंगेकर...
पुणे : गेल्या काही दिवसापासून पोर्शे कार अपघात प्रकरणावरून कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहेत. अशातच आज त्यांनी थेट पुण्यातील आयकर विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला.
यावेळी पुण्यातील पबला उत्पादन शुल्क विभाग जबाबदार असून पबकडून पोलिसांना लाखों रूपयाचे हप्ते येत असल्याचा आरोप देखील धंगेकर यांनी केला. यावेळी कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या.
आमदार रवींद्र धंगेकर हे कल्याणीनगर दुर्घटनेवरून सातत्याने पुणे पोलिस आणि प्रशासनावर टिका करतांना दिसत आहे. आज धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी थेट आयकर विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी त्यांनी बनावट नोटांनी भरलेला बॉक्सही उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणला. तसेच धंगेकर यांनी एसपींच्या कार्यालयात जात याविषयी त्यांनी जाब विचारला.
कार्यालयात जाताच रवींद्र धंगेकर यांनी सोबत आणलेली काही कागदपत्र काढली आणि त्यातून आयकर विभागाच्या एसपी चरणसिंग राजपूत यांना कुठून किती किती हप्ता मिळतो ? याची यादीच वाचून दाखवली. ज्यावेळी अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले. तेव्हा धंगेकर चांगलेच संतापले. तुम्ही स्वत : ला समजता काय ? मी एक आमदार म्हणून बोलतोय. तुम्हाला लाज कशी वाटत नाही हे सांगायला की हे सर्व खोटं आहे. असं धंगेकर म्हणाले. तर तुमच्याकडे कुठून आणि कसे पैसे येतात ? याची यादी माझ्याकडे आहे ? असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. आता तुम्हाला चांगल्याने सांगायला आलो आहोत. यापुढे सरळ बोलणार नाही. आमच्या पोलिसांनी काय कारवाी करायची ती करू द्या. पण यापुढे पुणेकरांना आमच्या मुलांना काही होऊ देणार नाही. आम्ही आता गप्प बसणार नाही. या यादीमध्ये कुठून साडेपाच लाख, कुठून १ लाख तर कुठून पन्नास हजार, तर कुठून नव्वद हजार तर कुठून पाच हजार हप्ता येतोय असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
Post a Comment
0 Comments