Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

क्राईम ब्राँच बोलतोय म्हणून मुलीला अटक करण्याची धमकी...

क्राईम ब्राँच म्हणून मुलीला अटक करण्याची धमकी...

पुणे : पुण्यातून ड्रग्ज चे रॅकेट चालवले गेले, कल्याणनगरमधील अपघातानं बेकायदा पब, बार ढाबे थाटल्याचे उघड झाले. या पब, ढाबेवाल्यांकडून एक्साइज चे अधिकारी महिन्याकाठी कोट्यवधींची वसुली करीत असल्याचा आरोप पुढे आला.

अशा घटनांनी पुणे दिवसागणिक हदरत असतानाच पोलिसांच्या क्राइम ब्रँच च्या नावाने बनावट फोनाफोनी करणारी टोळी आता पुण्यात धुमाकूळ घालत असल्याचे उघडकीस आले आहे. अपघात प्रकरणात पोलिस अडकले असतानाच, तोतया अधिकाऱ्यांच्या फोनाफोनीमुळे पोलिसांचे टेन्शन वाढणार आहे.

दुसरीकडे, मुलीच्या अटकेसाठी फोन केल्याचे सांगत पोलिसी खाक्यात रुबाब झडणाऱ्या डीसीपी ची नव्या पेठेतील व्यक्तीने (पालक) उलट तपासणी केली तेव्हा बनाव करणाऱ्या डीसीपी ची भंबेरी उडाली. या प्रकरणात आता पोलिस लक्ष घालून तपास करण्याची चिन्हे आहेत. एक-दोन नव्हे तर अशा घटना वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments