Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

अनधिकृत शाळेचे रक्षण खुद्द पुणे मनपा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून ; शिक्षण संस्थेतील संचालकांना पुणे मनपातील शिक्षण विभागाचा छुपा पाठिंबा...


अनधिकृत शाळेचे रक्षण खुद्द पुणे मनपा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून ; शिक्षण संस्थेतील संचालकांना पुणे मनपातील शिक्षण विभागाचा छुपा पाठिंबा...


पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :- पुणे मनपा शिक्षण विभागातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षण संस्थेतील संचालकांना मनपा शिक्षण विभागाचा छुपा पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकारांना खतपाणी मिळत आहे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत आहे.

कोंढव्यातील टीम्स तकवा शाळेला जुलै महिन्यात 2023 साली यांना त्वरित शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु संचालकांनी ह्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र सध्या पुण्यातील कोंढव्यात दिसून आले आहे. तसेच या आदेशात असे देखील सांगण्यात आले होते की जर शिक्षण संस्था त्वरित बंद झाली नाही तर दर दिवसाला दहा हजार रुपयाचं दंड सुद्धा ठोकण्यात येईल असा देखील त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता.


मग ही शिक्षण संस्था चालूच कशी ? असा मोठा प्रश्न सध्या उद्भवला आहे. शिक्षण मंडळातील अधिकारी व कर्मचारी नक्की झोपेत आहेत की जाणुन बुजुन कानाडोळा करत आहेत असे देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

तसेच या शाळेचे समायोजन केल्याचे पत्र पुणे मनपा शिक्षण मंडळातुन काढण्यात आला आहे. सदर समायोजन कोणत्या आधारावर आणि कोणत्या निकषावर करण्यात आले हा मोठा प्रश्न उद्भवला आहे. तसेच समायोजनचे पत्र काढलेले असताना देखील टीम्स थकवा शाळेने त्यांचे विद्यार्थी ज्या शाळेत समायोजन झाल्याचे पत्र निघाले आहे. त्या शाळेत बसवणे गरजेचे होते परंतु त्यांनी तसं न करता जी शाळा अनधिकृत होती त्याच शाळेत विद्यार्थ्यांना बसू दिले. 
यावर देखील पुणे मनपा शिक्षण विभागाचे शंकर मांडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर डोळे झाक करण्याचे काम केले आहे.
तसेच या अधिकाऱ्यांना आम्ही सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो त्यामध्ये प्रामुख्याने शंकर मांडवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते जाणून-बोजून पत्रकारांचा फोन स्वीकारत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
नक्की यांना पत्रकारांचा फोन स्वीकारण्यात काय अडचण आहे हा देखील मोठा प्रश्न उद्भवला आहे?

तसेच या शिक्षण संस्थेतील संचालकांवर फसवणुकी सारखे गंभीर गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते. आणि त्यातील काही संचालकांनी 6 महिन्यानंतर कारागृह सुद्धा भोगले आहे. आणि यामध्ये पोलिसांनी देखील आपल्या कामात कमतरता दाखवल्याने एवढा वेळ त्यांना अटक करण्याकरिता गेला. आणि पोलिसांच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे देखील संगनमत झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. लवकरच त्यांचे देखील नावे आम्ही बातमीच्या माध्यमातून जाहीर करणार आहोत.

तसेच या शाळेला काही राजकीय नेते आणि नगरसेवक देखील वरदहस्त आणि पाठराखण करत असल्याचे देखील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यांचे देखील नावे आम्ही बातमीच्या माध्यमातून समोर आणणार आहे.

तसेच मनपा शिक्षण विभागाकडे अनेक शिक्षण संस्थांमधील गैरप्रकारांबाबत तक्रारी येत आहेत. मात्र, या तक्रारींवर कारवाई करण्याऐवजी शिक्षण विभागाचे अधिकारी संबंधित शिक्षण संस्थांना चिरीमिरी घेऊन पाठराखण आणि संरक्षण देत असल्याचा आरोप नागरिकांमध्ये होत आहे.

त्यातच कोंढव्यातील अनधिकृत शाळांवर पुणे मनपातील शिक्षण विभागाचे अधिकारी कोंढव्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी शैक्षणिक जीवणासोबत जाणीवपूर्वक खेळत असल्याचे चित्र सध्या कोंढव्यात पाहायला मिळत आहे.

तसेच शिक्षण विभागाचे काही अधिकारी काही शिक्षण संस्थांमधील गैरप्रकारांमध्ये सहभागी असल्याचे माहिती समोर येत आहे. या अधिकाऱ्यांमुळेच अनाधिकृत शाळेंच्या गैरप्रकारांना खतपाणी मिळत आहे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत आहे.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडूनच असे अनधिकृत शाळेंना दुजोरा देण्याचे काम सुरू राहिले तर पालकांमध्ये आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात असल्याचे शंका व भीती निर्माण होईल आणि भविष्यात विद्यार्थी संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला सर्वस्वी जबाबदार शिक्षण विभागच राहतील.


शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह :
या प्रकरणामुळे मनपा शिक्षण विभागावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शिक्षण विभागाचे अधिकारी जर अनधिकृत शाळेंच्या गैरप्रकारांना संरक्षण देत असतील तर विद्यार्थ्यांचं भविष्य कसं सुरक्षित राहील? असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित होत आहे.

कारवाई झाली नाही तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार : इलियाज शेख - कार्याध्यक्ष दलित पॅंथर ऑफ इंडिया...
शिक्षण विभागाने या प्रकरणी त्वरित अनाधिकृत शाळेंवर कठोर कारवाई करणे गरजेचं आहे. आणि तपासात आरोपी सिद्ध झालेल्या शाळेच्या संस्थेवर आणि संबंधित त्या कार्यक्षेत्राचे अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. तसेच ज्या शाळेत टिम्स तकवा शाळेचे समायोजन झाले आहे त्या शाळेवर देखील दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. कारण त्यांना समायोजन करण्याचे पत्र दिले असताना देखील त्यांनी त्यावर अंमलबजावणी केली नाही. आणि जर शिक्षण विभागाने या शाळेवर कारवाई केली नाही तर आम्ही पुणे महानगरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे इलियाज शेख यांनी सांगितले आहे.

लवकरच या टिम्स तकवा शाळेची अनाधिकृत संस्थेची खळबळजनक माहिती जनते समोर आणण्याचे टाईम्स ऑफ महाराष्ट्र चे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आणखीन माहिती आम्ही दुसऱ्या बातमीच्या माध्यमातून समोर आणणार आहोत.

क्रमशः

Post a Comment

0 Comments