कोझी अन ब्लॅक ह्या पबचा होतोय नागरिकांना त्रास...
पुणे :- कोरेगाव पार्क येथील कोझी पब आणि मेरियेट येथील ब्लॅक पब यांच्यामुळे कोरेगाव अन् पुण्याच्या संस्कृतीचा ऱ्हास केला आहे. दररोज रात्री दोन-तीन वाजेपर्यंत, तर शनिवारी पहाटे साडेतीन, तर कधी चार वाजेपर्यंत पबमध्ये धांगडधिंगा चालत असतो. पबमध्ये इतका मोठा आवाज असतो की शेजारी राहणाऱ्यांची झोप उडते. रात्री बारा-साडेबारापासून ते पहाटे तीन पर्यंत पबमधून बाहेर येणारी मद्यधुंद यांचा रस्त्यावर बेधुंद अवस्थेत धिंगाणा सुरु असतो. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी मध्यारात्री झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेले अश्विनी कोस्टा व अनिस अवधिया हे दोघे कल्याणी नगर येथील बॉलर या पबमध्ये केले होते. हा पब सहा महिन्यापूर्वी सुरु झाला आहे. या शहरातील इतर पब प्रमाणे या पबला देखील रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र, जेव्हापासून हा पब सुरु झाला आहे तेव्हा पासून रात्री दोनच्या पुढेच बंद होतो. विशेषत: शनिवारी रात्री तीन-तीन वाजेपर्यंत सुरु असतो. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असल्याने त्यांनी या पब विरोधात अनेक तक्रार केल्या आहेत.
कल्याणी नगरच्या परिसरामध्ये प्रल्हाद भुतडा यांच्या मालकीचा कोझी हा पब आहे. याच पबमध्ये अपघातग्रस्त पोर्शे
या आलिशान गाडीचा चालक आला होता. याठिकाणचा व्यवस्थापक सचिन काटकर याने पबमध्ये प्रवेश देताना मुले
अल्पयीन आहेत की नाहीत याची खात्री केली नाही. यापूर्वी देखील त्याने कधीच खात्री केली नाही.
सॅटरडे नाईटच्या निमित्ताने सोशल मीडियावर वेगवेगळ्या जाहिराती देऊन, ऑफर्स द्याच्या आणि पाहिजे तितके ग्राहक
पबमध्ये घ्यायेच असा उद्योग राजसोस पणे सुरु असतो. मात्र, पबकडून त्यांच्यावर बंदी घातली जात नाही. पैसे भरा,
हातावर बँड बांधा आणि रात्रभर नाचा, दारु प्या, हुक्का घ्या असा प्रकार सुरु असतो.
अपघाताच्या घटनेतील आरोपी रात्री एक पर्यंत या पबमध्ये होता.
तेथून तो काही मित्रांसोबत पुन्हा कोरेगाव पार्क येथील संदीप सांगळे यांच्या मालकीच्या ब्लॅक या पबमध्ये गेला.
तेथील बार व्यवस्थापक राजेश बोनकर याने देखील त्याच्या वयाची खात्री केली नाही.
या पबमध्ये कायमच अल्पवयीन मुलांचा धिंगाणा सुरु असतो, अशी माहिती पबच्या शेजारी राहणाऱ्यांनी व रिक्षाचालकांनी दिली.
Post a Comment
0 Comments