Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

कार अपघात, मुख्यमंत्री शिंदेंचा पोलीस आयुक्तांना फोन...

कार अपघात मुख्यमंत्री शिंदेंचा पोलीस आयुक्तांना फोन...

पुणे : पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला आहे. पुण्यातील कल्याणीनगर इथं रविवारी पहाटे झालेल्या अपघातात पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह आतापर्यंत चौघांना अटक झाली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुणे पोलिसांना आदेश दिले आहेत.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात कोणालाही सवलत देऊ नये. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन आदेश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या देखील सूचना दिल्यात. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशाही सूचना दिल्या आहेत.

वडिलांनी दिली गाडी, दारु प्यायलाही परवानगी

पालकांनी एवढी महागडी गाडी दिली,त्याला दारू पिण्यास परवानगी दिली म्हणून त्याच्या विरोधात पण गुन्हा दाखल केला आहे. वडील आणि मॅनेजर याच्या विरोधात वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही कसूर सोडली नसून कायद्यानुसार सर्व प्रकिया पूर्ण करण्यात आलीय. एसीपी दर्जा अधिकारी या केसचा तपास करत आहे. आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असल्याचंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.


Post a Comment

0 Comments