Type Here to Get Search Results !

Add

Add

मतदानाआधी पुण्यात मोठी घडामोड रवींद्र धंगेकरांचे निवडणूक आयोगाला पत्र...

मतदानाआधी पुण्यात मोठी घडामोड रवींद्र धंगेकरांचे निवडणूक आयोगाला पत्र...

पुणे : शिरुर, मावळ, पुण्यासह लोकसभेच्या ११ मतदार संघांमध्ये उद्या मतदान पार पडणार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.

यामध्ये भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत चार मतदार संघ संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांविरोधात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांचे आव्हान आहे. उद्या पुणे लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे, त्याआधीच रविंद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधी पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला लिहले आहे.

या पत्रामध्ये त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चारही मतदारसंघात भागात सर्रास दारू व पैसे वाटप होत आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेले अनेक गुन्हेगार नागरिकांना धमकावत असून मतदान करण्यास प्रतिबंध करत असल्याचा सुद्धा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे बेकायदेशीर मतदारांची वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करून गाडी मालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments