जीव गेला ते राहिलं बाजूला शिक्षा हास्यास्पदच...
पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन पोराने शनिवारी मध्यरात्री बेदरकारपणे आलिशान कार चालवत दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोश्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन कारचालकाला नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला होता. त्यानंतर त्याला पोलिसाच्या हवाली करण्यात आले. पुणेपोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून कोर्टात हजरही केलं होतं. मात्र कोर्टाने काही अटी शर्ती घालून देत त्याला लगेच जामीनही दिला.
भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणारा कारचालक अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. म्हणून गुन्हा दाखल करताना त्याच्याविरोधात जामीनपात्र कलमं लावण्यात आली. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात त्याला जामीनही मिळालाय. याशिवाय आरोपी कारचालकानं पंधरा दिवस ट्राफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचं नियोजन करावं, दारू सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्याने निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी असं न्यायालयाने त्याला जामीन देताना सांगितलं..
Post a Comment
0 Comments