Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल...

रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल...

पुणे : पुणे लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. याच मतदानाच्या दरम्यान भाजप आणि क़ॉंग्रेसकडून आंदोलनं करण्यात आली. त्यात दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

त्यानंतर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरदेखील आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप यांच्यासह २० ते २५ महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिता असतानाही बेकायदेशीर जमाव जमून घोषणाबाजी करुन उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 

धंगेकरांवरही गुन्हा दाखल

पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव गोळा केल्या प्रकरणी धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. भाजपावरती पैसे वाटप केल्याचा आरोप करत धंगेकर यांनी मतदानाच्या आदल्या दिशवी ठिया आंदोलन केलेलं होतं. ते आंदोलन करणं धंगेकरांना चांगलंच महागात पडलं आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात धंगेकरांसह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची नावे सांगूनही त्यांच्यावर कसलीही कारवाई पोलीस करत नसल्याने सहकारनगर पोलीस ठाण्यातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी ठिय्या आंदोलन केलं होतं.

Post a Comment

0 Comments