पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या पाठपुराव्याने ६ महिन्याच्या बालकाचे अपहरण करून विक्री करणारे टोळीला कर्नाटक येथुन केले जेरंबद व अपहरण झालेल्या बालकाची सुटका...
पुणे :- राज्यात मुलांची तस्करी होत असताना पुण्यात स्टेशन वरून 56 महिन्यांच्या बालकाला पळून नेण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. सदरील माहिती अशी की, २७ एप्रिल शनिवारी पुणे रेल्वे स्टेशन, समोरिल मोकळ्या जागेत आई सोबत झोपलेल्या ६ महिन्याच्या बालकाला रात्री २.०० वाजताचे सुमारास अनोळखी इसमाने उचलुन चोरी केल्याचे मुलाचे नातेवाईक वडील यांनी ०४/०० वाजताचे सुमारास फिर्यादी वय ३४ वर्षे रा. यवतमाळ यांनी समक्ष पोलीस ठाणेस येवून कळविल्याने बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं.११८/२०२४ भादंवि कलम ३६३,३७०,३४ प्रमाणे गुन्हा नोदं करणेत आला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून, परिमंडळ 2 चे पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील यांच्या आदेशाने ३ टीम तयार करून परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता एका ठिकाणी संशयीत इसम मुलास उचलुन घेवून जाताना अस्पष्टपणे दिसुन आले. त्यानंतर पुन्हा बारकाईने पाहिले असता सदरचा संशयीत इसम हा पुणे स्टेशन परिसरातुन कोणत्या मार्गाने गेला हे दिसुन आले नाही त्यामुळे सदर गुन्हयामध्ये चारचाकी वाहनाचा वापर झाला असावा तसेच गुन्हयात आरोपी १ पेक्षा जास्त असल्याचा संशय बळविल्याने सदरबाबत तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयातील आरोपी हे चारचाकी गाडीने पुणे स्टेशन येथुन विजापुर राज्य कर्नाटक येथे गेल्याचे निष्पन्न झाले. यासाठी सातत्याने उपायुक्त स्मार्तना पाटील हे पाठपुरावा करत होते. यांच्या मार्गदर्शनाखाली हे निष्पन्न झाले.
त्यानंतर सदर गुन्हयाचे अनुषंगाने बंडगार्डन पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अतिशय उत्तम पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व त्यांची टीम कर्नाटक राज्यातील वीजापुर येथे तत्काळ रवाना करून सदर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकुन इसम नामे चंद्रशेखर मलकाप्पा नडुगंड्डी वय २४ वर्षे रा. जंबगी ता.जि. वीजापुर यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले त्याचेकडे कौशल्या पुर्ण तपास केला असता त्याने सदरचे बालक हे त्याचे इतर ४ साथीदार यांचे मदतीने अपहरण करून त्यांचेडील इंडिका कार मधुन वीजापुर येथे नेवून इसम नामे सुभाष सताप्पा कांबळे वय ५५ वर्षे रा. लांवगी सोलापुर यांना ३ लाख रुपयांना विक्री केल्याचे सांगितल्याने सदरील पोलीस पथकाने विजापुर शहर येथे वेगवेगळया हॉटेलमध्ये पाहणी केली असता हॉटेल राजधानी, गांधी चौक वीजापुर येथे अपहरण झालेले बालक व आरोपी सुभाष कांबळे यांना ताब्यात घेतले आहे.
सदरचे उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांनी रोख एक लाख रुपये बक्षिस देवून टिमचा गौरव केला आहे.
सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर स्मार्तना पाटील, सहा पोलीस आयुक्त लष्कर विभाग, संजय सुर्वे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निर्वाळकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप मधाळे, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोउपनि चेतन धनवडे, पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजु धुलगुडे, विलास केकान यांचे पथकाने केली.
Post a Comment
0 Comments