Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

वेशभूषा हे पात्राचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर मांडण्यात मदत करते ; पुणे कर्वे रोडवरील सोनल हॉल येथे सिल्क ऑफ इंडिया कॉटन हँडलूम हॅन्डी क्राफ्ट आर्ट या साड्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन...

वेशभूषा हे पात्राचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर मांडण्यात मदत करते ; पुणे कर्वे रोडवरील सोनल हॉल येथे सिल्क ऑफ इंडिया कॉटन हँडलूम हॅन्डी क्राफ्ट आर्ट या साड्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन...

पुणे : वेशभूषा हे पात्राचे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर प्रभावीरुपात  मांडण्यात व कलाकारांना पडद्यावर विश्वासार्ह अश्या व्यक्तींमध्ये रूपांतरित करण्यास  मदत करते. हे मत टेलिव्हिजन व रंगभूमीवरील अभिनेत्री तेजस्विनी सुनील यांनी मांडले. तेजस्विनी सुनील या कर्वे रोडवरील सोनल हॉल येथे आयोजित सिल्क ऑफ इंडिया कॉटन हँडलूम हॅन्डी क्राफ्ट आर्ट या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

तेजस्विनी सुनील यांनी स्वराज्य रक्षक संभाजी, काशीबाई बाजीराव बल्लाळ, अश्या ऐतिहासिक दूरदर्शन मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. तेजस्विनी सुनील पुढे म्हणाल्या की   हातमाग हे आपल्या देशाच्या समृद्ध व  वैविध्यपूर्ण सांस्कृतीचे प्रतीक आहे. तसेच हातमागाच्या वाढीसाठी देशातील युवकांनी हातमागाची उत्पादने ही त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरली पाहिजेत.

तेजस्विनी सुनील यांच्या हस्ते उद्घाटन केलेले हे  प्रदर्शन एक मे ते बारा मे दरम्यान सकाळी १०:३० ते रात्री ९.०० आयोजित केले गेले आहे. यामधील ५० हून  अधिक स्टॉलवर हातमाग कारागिरांना धर्मावरम, उप्पडा, गडवाल, मंगलगिरी, पोचमपल्ली, लखनौवी चिकन, शातूत सिल्क, पश्मिना शॉल,अश्या प्रकारची अनेक सुती हातमागाची उत्पादने सादर केली आहेत.

Post a Comment

0 Comments