Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

दलित पँथर ऑफ इंडियाकडून कोंढव्यातील अनधिकृत शाळांवर कारवाईची मागणी ; त्वरित कारवाई न झाल्यास शिक्षण विभागाच्या आणि पुणे मनपा कार्यालयावर ताळे ठोकण्याचा इशारा !

दलित पँथर ऑफ इंडियाकडून कोंढव्यातील अनधिकृत शाळांवर कारवाईची मागणी ; त्वरित कारवाई न झाल्यास शिक्षण विभागाच्या आणि पुणे मनपा कार्यालयावर ताळे ठोकण्याचा इशारा !

पुणे (मुज्जम्मील शेख): दलित पँथर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष इलियाज शेख यांनी कोंढवा परिसरातील टिम्स तकवा आणि इतर काही अनधिकृत शाळांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी शिक्षण विभागाला पत्राद्वारे केली आहे. या शाळा बेकायदेशीररित्या चालवल्या जात आहेत आणि शिक्षणाच्या नामे गरिब आणि वंचित मुलांची फसवणूक होत आहे असा आरोप शेख यांनी पत्रात केला आहे.

या पत्रात शेख यांनी म्हटले आहे की, "पुणे कोंढव्यातील टीम्स तकवा शाळेला जुलै महिन्यात 2023 साली यांना त्वरित शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु संचालकांनी ह्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र सध्या पुण्यातील कोंढव्यात दिसून आले आहे. तसेच या आदेशात असे देखील सांगण्यात होते की जर शिक्षण संस्था त्वरित बंद झाली नाही तर दर दिवसाला 10000/- रुपयाचं दंड सुद्धा ठोकण्यात येईल असा देखील त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता. मग ही शिक्षण संस्था चालूच कशी ? असा मोठा प्रश्न सध्या उद्भवला आहे. शिक्षण मंडळातील अधिकारी व कर्मचारी नक्की झोपेत आहेत की जाणून बुजुन कानाडोळा करत आहेत असे देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या शाळेचे समायोजन केल्याचे पत्र पुणे मनपा शिक्षण मंडळातुन काढण्यात आला आहे. सदर समायोजन कोणत्या आधारावर आणि कोणत्या आधारे करण्यात आले हा मोठा प्रश्न उद्भवला आहे. तसेच समायोजनचे पत्र काढलेले असताना देखील टीम्स तकवा शाळेने त्यांचे वि‌द्यार्थी ज्या शाळेत समायोजन झाल्याचे पत्र निघाले आहे. त्या शाळेत बसवणे गरजेचे होते परंतु त्यांनी तसं न करता जी शाळा अनधिकृत होती त्याच शाळेत विद्यार्थ्यांना बसू दिले. यावर देखील पुणे मनपा शिक्षण विभागाचे शंकर मांडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर डोळे झाक करण्याचे काम केले आहे.

तरी त्या वरती त्वरित कारवाई न झाल्यास दलित पँथर ऑफ इंडिया मार्फत टाळे ठोको आंदोलन तीव्र पद्धतीने करण्यात येईल. यामुळे गरिब आणि वंचित मुलांच्या शिक्षणाचा दर्जा खालावत आहे आणि त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे."

या शाळांवर कारवाई न झाल्यास दलित पँथर ऑफ इंडिया शिक्षण विभागाच्या कार्यालयावर ताळे ठोकण्याचे आंदोलन करेल असा इशाराही शेख यांनी दिला आहे. 

पत्र दिल्यानंतर काय म्हणाले इलियाज शेख...
सदर शाळेचे कारवाईची मागणी आम्ही केली आहे. तसेच ज्या शाळेत यांचे समायोजन झाले आहे. कोंढव्यातील दारे अर्कान या शाळेची आणि यांच्या संस्था चालक, विश्वस्त यांची शिक्षण विभागातील अनेक अधिकारी यांना हाताशी धरून अवैध काम सुरू असल्याची देखील माहिती आम्हाला मिळाली आहे. सदर शाळेची, यांना मदत करणारे अधिकाऱ्यांची आणि यांच्या विश्वसथांची चौकशीची मागणी शिक्षण आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, लाच लुचपुत विभाग आणि सीबीआय यांना करणार असल्याचे इलियाज शेख यांनी सांगितले आहे.

दलित पँथर ऑफ इंडियाच्या या मागणीमुळे शिक्षण विभागावर दबाव निर्माण झाला आहे आणि या अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. 

टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्युज चॅनेल लवकरच आणखीन टिम्स तकवा शाळा आणि कोंढव्यातील अनधिकृत शाळांबाबत मोठा गौप्यस्फोट करणार उघड.

Post a Comment

0 Comments