Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू...

डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू...

पुणे : भारती विद्यापीठ वाहतूक विभागाला सकाळी पावणे अकराच्या सुमारास पुणे-सातारा रोड कात्रज नवीन बोगद्यामध्ये एका दुचाकीचा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता दुचाकी चालक विश्वास धापटे (वय ४८ )रा.

बावडा तालुका पारगाव खंडाळा, जिल्हा सातारा हे बोगद्यामध्ये रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव देखील झाला होता.

वाहतूक विभागाकडून भारती पोलीस स्टेशनला व रुग्णवाहिकाला माहिती देण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी व रुग्णवाहिका दाखल होत सदरील बेशुद्ध अवस्थेत असलेले विश्वास धापटे यांना नवले हॉस्पिटल येथे नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांकडून मिळाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments