बारावीचा निकाल ९३.३७ टक्के, सोप्या...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि.२१) बारावीचा निकाल जाहीर केला. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता बारावीचा परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC 12th Result 2024) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्यात आला.
त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेच्या प्रमाणात २.१२ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल कोकणचा ९७.५१ टक्के एवढा आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबईचा ९१.९५ टक्के आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
मुलींची बाजी
यंदाही मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.६० टक्के आहे. तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४४ टक्के एवढे आहे.
विभागवार निकाल
पुणे ९४.४४ टक्के
नागपूर ९२.१२ टक्के
छत्रपती संभाजीनगर ९४.०८ टक्के
मुंबई ९१.९५ टक्के
कोल्हापूर ९४.२४ टक्के
अमरावती ९३ टक्के
नाशिक ९४.७१ टक्के
लातूर ९२.३६ टक्के
कोकण ९७.५१ टक्के
एकूण ९३.३७ टक्के
बारावी निकाल
९ विभागीय मंडळ
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेतली होती. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील १४ लाख, ३३,०७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
Post a Comment
0 Comments