Type Here to Get Search Results !

विश्वास बसत नाही दादा सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या विधानावर प्रतिक्रिया...

विश्वास बसत नाही दादा सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या विधानावर प्रतिक्रिया...

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी निवडणुकीत शेवटच्या तीन दिवसात धनशक्तीचा वापर होईल असं म्हटलं होतं.

सुनंदा पवार यांच्या वक्तव्याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीय. कोणी प्रश्न विचारला तर त्यासाठी उत्तर द्यायला मी बांधील नाही असं म्हटलं होतं. आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

सुप्रिया सुळे यांनी सुनंदा पवार यांच्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की,"मला त्याबद्दल काही माहिती नाही. मला विश्वास बसत नाही तो असा बोलू शकेल. मी चेक करून बोलते." भोर एमआयडीसीच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, अजित पवार पालकमंत्री होते. त्यांनी अनेक मिटिंग घेतल्या. तरी एमआयडीसी का झाली नाही? तुम्ही स्वत: १८ वर्षे पालकमंत्री होतात. सगळा कारभार हातात होता आणि माझ्यावर टीका होते याचं उत्तर मी कसं देऊ? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला.

काय म्हणाले होते अजित पवार?
सुनंदा पवार यांनी निवडणुकीत धनशक्तीचा वापर होईल असा आरोप केला होता. या आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी यावर काही बोलायचं नसल्याचं म्हटलं. पण त्याचवेळी आपण कोणी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर द्यायला बांधील नसल्याचं सांगितलं. आमच्या योग्यतेच्या माणसाने प्रश्न विचारला तर मी त्याला उत्तर देईल. मी कुणाला उत्तर द्यायला बांधील नाही असं म्हटलं होतं.

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. या सभेला अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला. 10 वर्ष पूर्वी भ्रष्टाचार नोकऱ्या आणि बेरोजगारी यावर कोणी काय शब्द दिला होता. या तिन्ही विषयवार 2014 पूर्वी ही लोक बोलत होते आता हे लोक बोलत नाही, आणि महागाई प्रचंड वाढली आहे, डाळ 200 किलो झाली आहे, या तिन्ही विषयवार आव्हान होती पण आता सत्तेतले लोक बोलत नाही, महाराष्ट्रत दुष्काळाची परिस्थिती गंभीर आणि पण सत्तेतली लोक बोलत नाहीत असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला.


Post a Comment

0 Comments