विश्वासू नोकरानेच केला तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत...
पुणे : हॉलमार्क करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानातून आलेले १२ लाख ४९ हजार रुपयांचे २१ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक पुण्यात प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत फरासखाना अवघ्या बारा तासात आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुकानातील कामगारानेच हा चोरीचा कट रचल्याचे समोर आले आहे.
याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे शहरात न्यू त्रिशूल हॉलमार्किंग सेंटरचे दुकान आहे. याच दुकानामध्ये आरोपी लकी मोहीते हा कामाला आहे. आरोपीने याच दुकानात यापूर्वी काम करणाऱ्या सचिन दडस व विशाल गोसावी यांच्याशी संगनमत करुन दुकानात चोरी करण्याचा प्लॅन केला. आरोपींनी त्यांचे इतर मित्र अतुल क्षीरसागर व सुरज महाजन यांच्या मदतीने फिर्यादी यांच्या दुकानातून हॉलमार्कसाठी आलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले.
हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास केला असता आरोपी माळशिरस भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी माळशिरस भागात आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त करुन बारा तासात गुन्हा उघडकीस आणला.
Post a Comment
0 Comments