पुणे, दि. ३ मे : नियतीने जरी आपल्याशी खेळ खेळला असला तरी स्वतःच्या अंगी असलेल्या आत्मविश्वासाच्या ताकदीवर स्वतःला सिद्ध करत एक हाती यश कसे खेचून आणता येते. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुण्यातील सुस रोड येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थी दिव्यांग जलतरणपट्टू सेरा चावला हिने जिल्हास्तरावर नावलौकिक मिळवला आहे. या जलतरणपटूचा प्रेरणादायी प्रवास अतिशय खडतर असला तरी इच्छाशक्तीच्या जोरावर तिने त्यावर मात केली आहे. जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरावर नाव कमावलं आहे.
मेक माय ड्रीम्स फाउंडेशनच्या वतीने डेक्कन जिमखाना टिळक जलतरण तलाव येथे दिव्यांगांसाठी नुकतीच राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये विद्यार्थीनी सेरा चावला हिने दोन रौप्य पदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल स्कूलचे संचालक यश मालपाणी, मुख्याध्यापिका संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सेरा चावला आपल्या यशाचे श्रेय पालकांबरोबरच स्कूलचे संचालक यश मालपाणी, संगीता राऊतजी, प्रशिक्षक स्मिता काटवे, उमा जोशी, रूपाली अनप आणि केशव हजारे यांना देते.
ही स्पर्धा पुणे जिल्ह्यात घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून जवळपास शेकडो स्पर्धक आले होते. दिव्यांगासाठी ही स्पर्धा पार पडली. स्पर्धा ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर अशा तीन गटात केले होते. फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, आयएम अशा पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेते खेळाडू जिल्ह्यास्तरीय प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धेचा जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना फायदा होईल. सामान्य खेळाडू प्रमाणेच दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यांचे आयोजन केले होते.
Post a Comment
0 Comments