Type Here to Get Search Results !

एका युवकाचा चार ते पाच युवकांनी मारहाण केल्यानंतर युवकाचा खून...

एका युवकाचा चार ते पाच युवकांनी मारहाण केल्यानंतर युवकाचा खून...

नागपूर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका युवकाचा चार ते पाच युवकांनी जबर मारहाण केल्यानंतर खून केला. ही घटना गुरुवारी रात्री नऊ वाजता वानाडोंगरी परीसरात घडली. कुणाल उर्फ बॅटरी सुनील कन्हेरे (२२,रा.गेडाम ले आउट, आय सी चौक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

कुणाल बॅटरी याच्यावर वाहन चोरीसारखे फौजदारी गुन्हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आज सायंकाळी वानाडोंगरी -संगम रोडच्या बाजूला अष्टविनायक वसाहतीच्या पाठीमागे एका ओसाड ले आउटमध्ये गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह या मार्गाने जाणाऱ्या वाटसरूला दिसला. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. एमआयडीसीचे ठाणेदार प्रवीण काळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. मयताच्या डोक्यावर जखमा होत्या. काही तासापूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली.

Post a Comment

0 Comments