Type Here to Get Search Results !

जमिनीवर डोके आपटून दोन दिवसांच्या बाळाची हत्या...

जमिनीवर डोके आपटून दोन दिवसांच्या बाळाची हत्या...

नागपूर : स्वतःच्या दोन दिवसांच्या बाळाचे डोके जमिनीवर आपटून त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गिरीश उर्फ महादेव गोंडाणे (वय २९, रा.

नांदगावपेठ, अमरावती) असे नराधम बापाचे नाव आहे. अजनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ही कारवाई झाली.

गिरीश गोंडाणे याचा प्रतिक्षा हिच्याशी जुलै 2021 मध्ये प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले. नंतर तो प्रतिक्षाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यावरून तो तिला मारहाणही करायचा. नंतर प्रतिक्षा गर्भवती झाली. तिला प्रसुतीसाठी अमरावतीच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

प्रतिक्षाच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केले. तिने बाळाला जन्म दिला. मुलगा झाल्याचे कळताच गिरीश नागपुरात पोहोचला. मुलाला पाहताच गिरीशने प्रतिक्षाशी वाद घातला. मुलाला हातात घेतले आणि अचानक त्याचे डोके जमिनीवर आदळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बाळ बेशुद्ध पडले. यामध्येच हे बाळ दगावले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Post a Comment

0 Comments