पोराच्या कारनाम्यामुळे सध्या अटकेत असेलेले विशाल अग्रवाल नेमके कोण...
पुणे : पुण्यात भरधाव असलेल्या पोर्शे कारने दोन इंजिनिअरला धडक दिली. यात दोन्ही इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पूर्ण राज्यात खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हि कार प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता.
या अपघातानंतर जमावाने सतरा वर्षाच्या मुलाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून आज पहाटेच्या सुमारास विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. पोराच्या हाती १७ व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग, पुण्यात मोठे गृहप्रकल्प, अलिशान गाड्यांचा शौक असलेले विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत चला पाहुयात…
कोण आहेत विशाल अग्रवाल ?
ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे विशाल अग्रवाल प्रमुख आहेत.
ब्रम्हा कॉर्प हे नाव पुण्यातील बांधकाम व्यवसायात मागील चाळीस वर्षांपासून आघाडीवर राहिलंय.
ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योगसमूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत.
पुण्यातील वडगाव शेरी, खराडी, विमान नगर या भागात अनेक मोठे गृहप्रकल्प या कंपनीने उभारले आहेत.
त्याचबरोबर पुण्यातील ली मेरिडियन हॉटेल , रेसिडेन्सी क्लब यासारखी मोठी बांधकामे देखील या कंपनीने केली आहेत.
Post a Comment
0 Comments