Type Here to Get Search Results !

वार्षिक निरीक्षण अनुषंगाने सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र यांची पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयास भेट...


वार्षिक निरीक्षण अनुषंगाने सुनिल फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र यांची पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयास भेट...

पुणे :-  सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांचे पुणे ग्रामीण पोलीस दल मुख्यालय वार्षिक निरीक्षणाचा नियोजीत कार्यकम पारपडला.

दिनांक ०३.०४.२०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजता वार्षिक निरीक्षण अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल मुख्यालय येथे समारंभीय कवायत आयोजीत करण्यात आली होती.


सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर यांना पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण यांनी मानवंदना दिली, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी समारंभीय कवायतीचे निरीक्षण केले. रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी कवायतीचे नेतृत्व केले. त्यानंतर पी.टी क्लास, लाठी ड्रिल, गार्ड ड्रिल, बि.डि.डि.एस पथकाचे प्रात्येक्षिक, आगामी काळात येणारे महत्वाचे बंदोबस्त दृष्टीकोनातून माँब डिसपर्सल प्रात्येक्षिकाचे निरीक्षण केले.

तसेच पुणे ग्रामीण येथील भिमाशंकर हॉल मध्ये दरबार घेतला. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रलयीन कर्मचारी व वर्ग ४ कर्मचारी यांचे अडीअडचणी दरबार मध्ये जाणुन घेतल्या व त्या सोडवीण्याचे आश्वासन दिले.

दरबार संपन्न झालेनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी गुन्हा बैठक घेतली. सदर बैठकीत पुणे ग्रामीण दलातील उपविभागीय पोलीस अधीकारी, प्रभारी अधीकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे कडुन जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला व गुन्हयाचे प्रमाण रोखेणे करीता कराव्या लागणाऱ्या उपायोजना, गुन्हेगारांना आळा घालणे, गुन्हा उकल, दोषसिध्दी, एन.डी.पी.एस गुन्हे, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त व सार्वत्रीक लोकसभा निवडणुक बंदोबस्त तयारी बाबत मार्गदर्शन केले. बैठकीत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मानोबल वाढावे या दृष्टीने उतकृष्ट तपास करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments