Type Here to Get Search Results !

कोंढव्यात सामाजिक कार्यकर्ते शोएब खान यांच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी संपन्न; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दिले यामाध्यमातून संदेश...

कोंढव्यात सामाजिक कार्यकर्ते शोएब खान यांच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी संपन्न; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दिले यामाध्यमातून संदेश...

पुणे :- सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र असलेला रमजान महिना सुरू आहे. यातच अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहेत. त्यातच कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष शोएब खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने कोंढव्यात रविवारी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीमध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदायातील नागरिकांनी एकत्रितपणे इफ्तार करून बंधुभावाचे दर्शन घडवले.

इफ्तार पार्टीमध्ये विविध प्रकारचे स्वादिष्ट इफ्तार पदार्थ, मुलांसाठी मनोरंजक खेळ आणि कार्यक्रम, प्रसिद्ध धार्मिक विद्वानांचे प्रवचन (बयान) आणि गरजू लोकांसाठी मदत वाटप यांचा समावेश होता.

दरवर्षी शोएब खान इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात.


तसेच यावेळी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे
यांनी सांगितले की, या कार्यक्रमाद्वारे सामाजिक बंधुभाव आणि समन्वय वाढण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच सामाजिक बांधिलकीही वाढेल असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी शोएब खान यांच्या कार्याचे कौतुक देखील केले. सातत्याने काहीना काही समाज उपयोगी कार्यक्रम शोएब खान करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी सांगितले की, असे कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल त्यांनी शोएब खान यांचे अभिनंदन केले. युवकांनी असे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घ्यावा असाही त्यांनी या माध्यमातून युवकांना संदेश दिला. 

यावेळी शोएब खान यांनी बोलताना म्हटले की, ही इफ्तार पार्टी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी बंधुभाव आणि समन्वय यांच्या भावनांनी एकत्रितपणे जीवन जगणे गरजेचे आहे. आम्ही सर्वांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सामाजिक एकता मजबूत करण्याचे आवाहन करतो.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक रईस सुंडके, काँग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, नवनीत गांधी, देविदास लोणकर, छबिल पटेल, फैय्याज शेख, नूर शेख, सिकंदर सय्यद व आदी उपस्थित होते.

या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्थाही चांगली होती.

या कार्यक्रमाचे सर्वस्वी आयोजन समता युवा मंचाचे वतीने करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments