पिंपरी मध्ये हवाई दलाचा ट्रक पलटी...
पुणे : पिंपरी मधील मोरवाडी येथे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर हवाई दलाचा ट्रक पलटी झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३०) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हवाई दलाचा ट्रक पुण्याहून निगडीच्या पिंपरी दिशेने जात होता.
मोरवाडी येथे आल्यानंतर ट्रक समोर अचानक दुचाकी आली. दुचाकीला वाचवण्यासाठी चालकाने ट्रक वळवला असता ट्रक पलटी झाला. ट्रक मधील ऑइल रस्त्यावर सांडले. तसेच पुणे मुंबई मार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस तसेच वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलिसांनी खराळवाडी येथून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला केला.
Post a Comment
0 Comments