Type Here to Get Search Results !

नवी मुंबईत २७ वर्षीय तरुणीची हत्या...

नवी मुंबईत २७ वर्षीय तरुणीची हत्या...

नवी मुंबई : नवी मुंबईत दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २७ वर्षीय पूनम क्षीरसागर नावाच्या तरुणीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चाँद नावाच्या मुलासोबत ती बेपत्ता झाली होती.

मानखुर्दमधील साठेनगरमध्ये राहणाऱ्या पूनमची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमधून टाकला होता. आता तिची हत्या लव्ह जिहाद असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

पूनम क्षीरसागर ही दहा दिवसांपूर्वी निजाम नावाच्या मुलासोबत बेपत्ता झालेली होती. दहा दिवसानंतर एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या निर्घृण हत्येनंतर स्थानिक हिंदू समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. - मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन. तसेच दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. माध्यमांशी संवाद साधताना लोढा म्हणाले, मुंबईतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

गुरुवारी सकाळी उरणमध्ये पूनमचा मृतदेह कुजलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. आई आणि भावाने मृतदेह ओळखला. तिच्या केसांना असलेली क्लीप, दोन बोटांमधली अंगठी आणि कपड्यांसोबत एक बांगडी यावरून तिची ओळख पटवण्यात आली. डाव्या हातावर एस तर दुसऱ्या हातावर सूरज असा टॅटू होता.

वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, ओळख पटल्यानंतर आम्ही चौकशी सुरू केली. तेव्हा तरुणी चार वर्षांपासून नागपाडा इथं एका टॅक्सी चालकासोबत रिलेशनमध्ये होती असं समोर आलं. याबाबत कुटुंबियांना माहिती नव्हती. पोलिसांनी २८ वर्षीय निजामुद्दीन अलीला मानखुर्दमधून आटक केलीय. त्याने चौकशीत आपला गुन्हा मान्य केला आहे. सँडहर्स्ट रोडवर घरकाम करणारी पूनम १८ एप्रिलला कामासाठी घरातून निघाली पण ती परतलीच नव्हती. तिच्या कुटुंबियांनी पूनम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.


Post a Comment

0 Comments