Type Here to Get Search Results !

मुंबई पुणे एक्सप्रेसवेत बसला लागली आग टायर फुटल्याने प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेटल पेट...

मुंबई पुणे एक्सप्रेसवेत बसला लागली आग टायर फुटल्याने प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेटल पेट...

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज मोठी दुर्घटना टळली आहे. खाजगी बसने अचानक पेट घेतला होता. टायर फुटल्याने बसने पेट घेतल्याची माहिती मिळत आहे ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. आढे गावच्या हद्दीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, टायर फुटल्याने बसने अचानक पेट घेतला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते. बसने अचानक पेट घेतल्याने अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवलं. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आहे, सर्व प्रवासी सुखरुप आहे. आगीवर अग्निशमन दल आणि यंत्रणेने नियंत्रण मिळवले आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस केंद्र वडगाव हद्दीत किलोमीटर ७८ पुणे लेनवर सकाळी ७.०० च्या सुमारास खाजगी टॅव्हल बसचा टायर फुटून आग लागली व शॉट सर्किट झाल्याने बसने पेट घेतला. या बसमध्ये ३६ प्रवासी प्रवास करत होते. आय. आर. बी. पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवली गेली असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

Post a Comment

0 Comments