Type Here to Get Search Results !

कवडीपाट टोलनाका, थेऊर येथे लोणी काळभोर पोलिसांचे पथ...

कवडीपाट टोलनाका, थेऊर येथे लोणी काळभोर पोलिसांचे पथ...

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निकाडणुका २०२४ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. २६) पथ संचलन काढले होते.

पोलिसांच्या ताफ्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. लोणी काळभोर गावातून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पथ संचलनाला सुरुवात केली. हे पथ संचलन पुढे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका, थेऊर परिसरातून काढण्यात आले. त्यानंतर वडकी नाला, वडकी फाटा, १० वा मैल व पुढे उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत डॉ. आंबेडकर चौक तसेच या दोन्ही गावातील मंदिरे, मस्जिद येथे पार पडले. या पथ संचलनाचे आयोजन लोणी काळभोर पोलीस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

दरम्यान, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, तसेच जर कोणी समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलीस मदतीसाठी ११२ या नंबर क्रमांकवर कॉल करावा, असे आवाहन नागरिकांना पथ संचलनादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले.


Post a Comment

0 Comments