Type Here to Get Search Results !

टाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट ; DSI मंगलदास माने यांची बदली ; कर्मचाऱ्यांनी केले आणखीन गंभीर आरोप...

टाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट ; DSI मंगलदास माने यांची बदली ;  कर्मचाऱ्यांनी केले आणखीन गंभीर आरोप...

पुणे :- काही दिवसांपूर्वीच मंगलदास माने यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत टाइम्स ऑफ महाराष्ट्राने बातमी लावली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने त्यांची पुणे महानगरपालिकेकडून बदली करण्यात आली आहे. हे सगळं चित्र झालं असताना आता एक नवीन ट्विस्ट यामध्ये आला आहे. त्यांच्याकडील असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे व्हिडिओ प्राप्त झाले आहे. यामध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने यांच्यावर कामावर लावण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून 25 हजार रुपये मागणी केल्याचे गंभीर आरोप केले आहे. या 25000 पैकी त्यांनी 15000 रुपयांमध्ये त्या व्यक्तीला कामावर घेतल्याचे आरोप करण्यात आले आहे.
तसेच या तक्रारदाराने सांगितले आहे की मला आयुक्तांसमोर जरी उभा केलं तरी मी हे सर्व आरोप त्यांच्यासमोर देखील मांडणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

                 👇👇 पहा व्हिडिओ 👇👇

वरीष्ठ आरोग्य निरीक्षक माने यांची बदली परंतु खलील कर्मचाऱ्यांवर आणखीन वचक...
सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, वरीष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने यांची बदली झाली आहे. परंतु त्यांच्याकडील असलेले आरोग्य निरीक्षक, मुकादम, बिगारी व इतर कर्मचारी हे मंगलदास माने यांच्याच इशाऱ्यावर नाचत असल्याचे चित्र सध्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments