Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पीएमसी अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल पुणे महानगरपालिकाही भ्रष्टाचाराचे आगर - मुकुंद किर्दत.

पीएमसी अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल पुणे महानगरपालिकाही भ्रष्टाचाराचे आगर - मुकुंद किर्दत...

पुणे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या टेबल ड्रॉवरमध्ये पीएमसी जवळपास दोन ते तीन लाख रुपयांची रक्कम असलेले बंडल सापडले. यावर महानगरपालिका पथविभागाचे प्रमुख पावस्कर यांनी वरिष्ठांशी बोलतो असे मोघम उत्तर दिल्यामुळे या संदर्भात आता आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तसेच महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

सदरचे पैसे कोणत्या व्यक्तीकडून आले, त्या व्यक्तीचा ठेकेदाराशी संबंध काय? तसेच या ठेकेदाराकडे कोणकोणती कंत्राटे आहेत? या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे. महानगरपालिका हे आता भ्रष्टाचाराचे आगर झाले असून अर्थिक वर्षाखेरीस अधिकाऱ्यांवर टक्के वारीचा पाऊस पडतो. डबल इंजिन सरकारच्या थेट अधिपत्याखाली असलेले प्रशासनही भ्रष्टाचारीच आहे. महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे हे केवळ छोटे टोक आहे अशी प्रतिक्रिया मुकुंद किर्दत यांनी दिली आहे.

सविस्तर माहिती अशी, की आपचे पिंपरी - चिंचवड युवक शहराध्यक्ष रविकांत काळे हे कामानिमित्त महापालिकेच्या पथ विभागात गेले असताना त्यांना संशयास्पद हालचाली दिसली. त्यावेळेस कार्यालयातील कनिष्ठ पीएमसी अभियंताला येथे एका ठेकेदाराने नोटांचे बंडल असलेले बंद पाकीट दिल्याचे काळे यांनी पाहिले. या अभियंत्याने हे पाकीट टेबलाच्या ड्रायव्हर मध्ये ठेवून दिले. हा प्रकार पाहिल्यावर काळे व त्यांच्या सहकाऱ्याने संबंधित अभियंताला विचारणा केली. त्यावर या अभियंताने एका ठेकेदाराने पैसे थोड्या वेळासाठी ते आपल्याकडे ठेवायला दिले असल्याचे सांगत उडवा उडवीची उत्तरे दिली.

मात्र काळे यांनी ड्रॉवर मधून पाकीट काढल्यावर त्यात दोन ते तीन लाखाची रक्कम असल्याचे दिसून आले. आपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उजेडात आणल्यावर संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पालिकेतील लाच खोरीचा पर्दाफाश झाला आहे. या सर्वांचे व्हिडिओ चित्रिकरण व्हायरल झाले आहे.

Post a Comment

0 Comments