Type Here to Get Search Results !

किरकटवाडीत अफुची शेती करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल.

किरकटवाडीत अफुची शेती करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल...

पुणे : किरकटवाडीत विना परवाना अफुची लागवड करणाऱ्या दोघांना‌ हवेली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तानाजी‌ शांताराम हगवणे व शिवाजी बबन हगवणे यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले.

अफुची लागवड केलेली दिसून येऊ नये. म्हणून शेतात कांदा पिकाची लागवड केली होती. या‌ ठिकाणी १४.४५० किलो ग्रॅम वजनाची अफुची बोंडे असलेली एकूण एक हजार १७८ झाडे. २८,७०० रुपयांची जप्त करण्यात आली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस स्टेशन पोलीसांनी ही कारवाई केली. या अंमली पदार्थ असणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीर लागवड केली होती. त्याचे उत्पादन घेणे. त्यांची विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो. अशी धारणा या लोकांची‌ झाली आहे. यातूनच कायद्याचे उल्लंघन केले होते.

जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे कारवाई करण्याचे आदेश पोलीसांना केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय माहिती मिळाली. हवेली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, 

अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू विरकर, हवेली पोलिस ठाण्याचे कडील सहायक पोलिस निरीक्षक विकास अडागळे, पोलीस अंमलदार दिलीप आंबेकर, अशोक तारू, गणेश धनवे, संतोष भापकर, रजनीकांत खंडाळे, सचिन गुंड, मकसुद सय्यद यांनी केली.

Post a Comment

0 Comments