Type Here to Get Search Results !

गुप्त पद्धतीने आणि गनिमी काव्याने पार्थ पवारांचा प्रचार चालू.

गुप्त पद्धतीने आणि गनिमी काव्याने पार्थ पवारांचा प्रचार चालू...

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून आपल्या राज्यात देखील अद्याप ही प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरूच आहे.पण राज्यातील बारामती लोकसभा मतदार संघाकडे यंदा सर्वांचे लक्ष लागून आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला दोन्ही पक्षातील नेते मंडळी आमनेसामने आले आहेत.तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर सुप्रिया सुळे या गावोगावी जाऊन प्रचार सुरू केला आहे. मात्र अद्याप पर्यंत महायुतीकडून उमेदवार जाहीर केला नसला तरी अजित पवार हे महायुती सहभागी झाले असल्याने त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.येत्या काही दिवसात त्यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.तर त्यापूर्वी मागील दोन महिन्यापासून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मतदार संघातील नागरिकांशी मेळाव्यासह अन्य कार्यक्रमामधून संवाद साधत आहेत. तर त्यांच्या बरोबरीने जय पवार हे देखील नागरिकांशी संवाद साधत आहे.मात्र या सर्वामध्ये पार्थ पवार प्रचार यंत्रणेत कुठेही सहभागी होताना दिसत नाही.

या सर्व घडामोडी दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या धायरी भागात महायुतीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार,भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी महायुती सोबत असलेले घटक पक्षाचे नेते मंडळी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना अजित पवार यांनी राज्यातील अनेक घडामोडी बाबत भूमिका देखील मांडली.त्यावेळी पार्थ पवार हे प्रचार यंत्रणेत सहभागी होताना दिसत नाही.त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,ते गुप्त पद्धतीने प्रचार करतात.गनिमी काव्याने प्रचार चालू असल्याचे मिश्किलपणे सांगताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

Post a Comment

0 Comments