Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुण्यात आणखीन एक गोळीबार ; पुण्यात नेमकं चाललंय तरी काय ; क्रिकेटच्या वादातून झाले गोळीबार.

पुण्यात आणखीन एक गोळीबार ; पुण्यात नेमकं चाललंय तरी काय ; क्रिकेटच्या वादातून झाले गोळीबार...

पुणे : क्रिकेटवरून झालेल्या वादातून पुण्यात गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे.

पुण्यातील कात्रज भागात हा सर्व प्रकार घडला असून, सुदैवानं गोळीबारात कोणी जखमी नाही. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रिकेट सामना सरू असताना झालेला वाद मिटवण्यासाठी दोन्ही गट भेटीला आले असतानाच पुन्हा वाद झाला. त्यामुळे दोन्ही गटातील तरुण आक्रमक झाले. याचवेळी एकाने थेट पिस्तुल काढत समोर आलेल्या तरुणाच्या दिशने पिस्तुल करत थेट गोळीबार केला. मात्र, या तरुणाने स्वतःचा बचाव केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि तो थोडक्यात बचावला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज भागात राहत असलेल्या दोन गटात क्रिकेटचा सामना मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, मॅच सुरु असतानाच क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. हाच वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटातील तरुण पुन्हा बुधवारी भेटले. यावेळी एका गटात एक रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता. तर, वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये पुन्हा वाद झाले. दरम्यान, यावेळी एका तरुणाने समोरच्या गटात असणाऱ्या तरुणावर बंदूक ताणली आणि गोळी चालवली. मात्र, ती गोळी त्याला लागली नाही. गोळीबार होताच परिसरात पळापळ झाली आणि यावेळी दोन तरुण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे जिल्ह्यात गोळीबार करणं आता नेहमीचं झालं असल्याचे मागील काही दिवसांच्या घटनांवरून समोर येत आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून असलेलं पुणे आता गोळीबारांच्या घटनांवरून चर्चेत येत आहे. मागील मागील आठवड्यातच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ रात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये घुसून जेवणाला बसलेल्या या तरुणाची हत्या करण्यात आली. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. आता तर क्रिकेटच्या वादातून गोळीबार केला जात असल्याचे समोर आले आहे.



Post a Comment

0 Comments