सुरक्षित आणि वाजवी दरात ऑटो राईड देण्यासाठी पुण्यात ONDC-सक्षम ‘ओ रिक्षा’ ऍप सुरू...
‘O रिक्षा’ ऍपच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे चालकांना त्यांचा योग्य मोबदला मिळेल याची खातरजमा करतानाच शून्य-कमिशन मॉडेलशी बांधिलकी. शिवाय, हे ऍप सरकारच्या ‘निर्धारित भाडे’ तत्वाचे पालन करते, त्यामुळे वापरकर्त्यांसाठी वाहतूक परवडण्याजोगी व पारदर्शक बनते.
ONDC विषयी
31 डिसेंबर 2021 रोजी उभी करण्यात आलेली, (Open Network for Digital Commerce) ONDC, एक सेक्शन 8 कंपनी असून उद्योग आणि अंतर्गत व्यापार, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकारच्या प्रोत्साहन विभागाचा तो एक उपक्रम आहे. ज्याचा उद्देश डिजिटल कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणणारे एक सुविधाजनक मॉडेल तयार करून भारतात रिटेल ई-कॉमर्सच्या व्याप्तीवर जोर देण्याचा आहे. ONDC हे एक ऍप्लिकेशन, प्लॅटफॉर्म, मध्यस्थ किंवा सॉफ्टवेअर नाही तर तो एक खुला, स्वतंत्र आणि इंटर-ऑपेरेबल ओपन नेटवर्कला चालना देण्यासाठी डिझाईन केलेल्या वैशिष्ट्यांचा एक संच आहे.
सुमा सॉफ्ट विषयी
सुमा सॉफ्ट हा IT सेवा आणि सोल्यूशन्सचा एक आघाडीचा जागतिक प्रदाता आहे, जो इनोव्हेशन आणि कौशल्याद्वारे उत्कृष्टता प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. 2 दशकांपेक्षा मोठा, समृद्ध इतिहास असलेल्या सुमो सॉफ्टने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबरसुरक्षा, IT सपोर्ट आणि अशा इतर अनेक सेवांचा सर्वसमावेशक संच प्रदान करून, विविध उद्योगांमधील व्यवसायांसाठी एक विश्वासू भागीदार म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्ध सुमा सॉफ्ट प्रत्येक ग्राहकाच्या असाधारण गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेते व उत्कृष्ट प्रथा राबवते आणि कार्यक्षमता, स्केलेबिलिटी आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते. ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन आणि उत्कृष्टतेचा निरंतर ध्यास घेऊन सुमा सॉफ्ट जगभरात डिजिटल परिवर्तनाला चालना देत आहे आणि जगभरातील संस्थांना सक्षम बनवत आहे.
Post a Comment
0 Comments