Type Here to Get Search Results !

सराफी पेढीतून एक लाखाच्या बांगड्याची चोरी;पुण्यातील घटना.

सराफी पेढीतून एक लाखाच्या बांगड्याची चोरी;पुण्यातील घटना...

पुणे : सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलांनी एक लाख १६ हजार रुपयांच्या साेन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत सराफी पेढीचे मालक ओंकार वेर्णेकर (वय २३, रा. बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

वेर्णेकर यांची सोन्या मारुती चौकात सराफी पेढी आहे. सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने तीन महिला शिरल्या. सराफी पेढीतील कर्मचाऱ्याला दागिने दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून महिलांनी प्लास्टिक ट्रेमधील एक लाख १६ हजार ८०० रुपयांच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरून नेल्या.बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वेर्णेकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. दागिने चोरून पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments