Type Here to Get Search Results !

मनसे महायुतीत? शिंदे गटातून लोकसभेच्या दोन जागा.

मनसे महायुतीत? शिंदे गटातून लोकसभेच्या दोन जागा...

मुंबई : भाजप- शिवसेना - राष्ट्रवादीतील लोकसभा निवडणुकीच्या जागांचा तिढा सुटला नसला, तरी महाराष्ट्र नवर्निमाण सेना महायुतीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागा मनसेला देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी दर्शविली आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेसोबत राहिल्यास विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी एकनाथ शिंदेंना मनसेची मदत होणार आहे. त्यासाठी मनसेला थेट महायुतीत न घेता शिवसेनेच्या दोन जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. यात मनसेच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय होण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मात्र, या दोन जागा कोणत्या असतील हे सांगण्यास सूत्रांकडून नकार देण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. यात महायुतीचा ८० टक्के जागा वाटपाच तिढा सुटलेला आहे. राज्यातील ४८ जागांमध्ये राष्ट्रवादीला ३ तर शिवसेनेला १३ जागा आणि भाजप ३२ जागांवर लढण्याचा तोडगा निघाल्याची चर्चा आहे.

मात्र, शिवसेनेला ११ जागा देण्यावर भाजप ठाम आहे. मात्र, मनसेसोबत आल्यास विधानसभा निवडणुकीत फायदाच होणार असल्याने मनसेचा महायुतीत थेट समावेश न करता मागच्या दाराने एकनाथ शिंदे हे मनसेला सोबत घेण्याची चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments