हैदराबादमध्ये मोफत हलीम घेण्यासाठी जमली मोठी गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज...
सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. अशात अनेक ठिकाणी खास दावतीचे आयोजन केले जाते. नुकतेच हैदराबादच्या मलकपेठ येथील रेस्टॉरंटनेही मोफत हलीम देण्याची घोषणा केली होती.
मात्र मोफत हलीम घेण्यासाठी एवढी गर्दी जमली की, पोलिसांना घटनास्थळी पोहोचावे लागले आणि लाठीचार्ज करावा लागला. अहवालानुसार, आज सकाळी हैदराबादच्या मलकपेट येथील रेस्टॉरंटमध्ये मोफत हलीम प्राप्त करण्यासाठी कथितपणे जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने पोलिसांना पाचारण केले, त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
रमजानच्या पहिल्या दिवशी रेस्टॉरंटने मोफत हलीम देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेकडो लोक रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. गर्दी खूप वाढली आणि काही वेळातच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मालकपेठ पोलिसांनी हॉटेल मालकावर उपद्रव आणि वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment
0 Comments