Type Here to Get Search Results !

मुंबई- आग्रा महामार्गावर कंटेनरच्या धडकेत कार पलटी चार जण जखमी.

मुंबई- आग्रा महामार्गावर कंटेनरच्या धडकेत कार पलटी चार जण जखमी...

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर सोमवारी दुपारी १२ वाजता प्रणाम हॉटेल जवळ कंटेनरने कारला धडक मारल्यामुळे कार पलटी झाली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहे.

या सर्वांना नाशिक येथील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, या अपघातातील कारचा क्रं,MH.15.EX.1688 हा असून अपघातात कमलाकर शिंदे (५३), अरूण भांबरे (५०), माणिक योगेश सावकारे (१२), अनिल रामभाऊ जाधव (४८) रा. नाशिक हे जखमी झाले आहे. मुंबईहून नाशिककडे जाणा-या कंटेनरने कारला कट मारला. यामुळे कार पलटी झाली. त्यात हे चार जण गंभीर जखमी झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॉटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली व त्या जखमींना तात्काळ नाशिक येथील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले.


Post a Comment

0 Comments