इंदापूर येथील एका तरुणाची निर्गुण हत्या आरोपी फरार...
पुणे : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडून आणि कोयत्याने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना इंदापूरमध्ये काल घडली होती.
अविनाश बाळू धनवे (वय ३४ अंदाजे) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रं फिरवली, या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती एसपी पंकज देशमुख यांनी दिली आहे. ज्याचा खून झाला तो पण मोक्क्यातला आरोपी होता. तसंच ज्यांनी हल्ला केला ते पण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. हे सर्व गुन्हेगार आळंदी नजीकच्या चऱ्होली परिसरातले आहेत. अविनाश धनवे हा पंढरपूरला जात असताना त्याच्या मिञाशी संगनमत करून हा हल्ला झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या गोळीबाराचं सीसीटीव्ही राज्यभरात व्हायरल झाल्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे.
अविनाश धनवे हत्याकांडातील सर्व आरोपी हे लँड डिलिंगशी संबंधित आहेत. जमीन खरेदी विक्री, बेकायदा ताबा मिळवणे अशा व्यवहारात त्यांच्यावर आळंदी, चाकण व चऱ्होली परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच हा भयानक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.
Post a Comment
0 Comments