Type Here to Get Search Results !

सुव्यवस्थित दैनंदिन प्रवासासाठी सायबेजची पुणे मेट्रोशी भागीदारी : पर्यावरण आणि भरभराटीकडे नेणाऱ्या मनुष्यबळाला प्राधान्य...


सुव्यवस्थित दैनंदिन प्रवासासाठी सायबेजची पुणे मेट्रोशी भागीदारी : पर्यावरण आणि भरभराटीकडे नेणाऱ्या मनुष्यबळाला प्राधान्य...

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) :- 'ब्रिंगिंग लाईफ टू वर्क' या ब्रीदवाक्याबरोबरच्या आपल्या वचनबद्धतेला नव्या उंचीवर घेऊन जात सायबेज या आघाडीच्या जागतिक माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील कंपनीने पुणे मेट्रोबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. या माध्यमातून सायबेजने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आणि कर्मचारी कल्याणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भविष्याला पाठिंबा देण्यासाठी मोठी झेप घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

दोन आठवड्यांआधी सुरू झाल्यापासून पुणे मेट्रोने सायबेज कर्मचाऱ्यांबरोबरच हजारो पुणेकरांचा प्रवास सहज - सुलभ केला आहे. पुणे मेट्रो मार्ग सुरू झाल्यामुळे पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात पुणेकरांना सहज - सुलभ ये - जा करणे शक्य झाले आहे. या मेट्रो मार्गात 16 स्थानके असून यामुळे सायबेज कंपनीच्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचा प्रवासासाठीचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

                    👆👆 पहा व्हिडीओ 👆👆

पुणे मेट्रो मार्ग सुरू झाल्याने त्याचा पर्यावरणावर निर्विवाद प्रभाव पडला आहे. सायबेजने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वाहन वापरात लक्षणीय घट झाल्याची नोंद केली आहे. कारण त्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांनी मेट्रोने प्रवास करण्याचा स्वीकार केला आहे. यामुळे प्रत्येक आठवड्यात रस्त्यावरील चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. परिणामी कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन अपेक्षेप्रमाणे कमी होऊन सायबेजच्या कार्बन फूट प्रिंटमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
सायबेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण नाथानी याबाबत म्हणाले की, "सायबेजचा विश्वास आहे की आमचे यश आमच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणात गुंतलेले आहे. पुणे मेट्रोबरोबर सायबेजने केलेली भागीदारी कर्मचारी सुरक्षितता आणि शाश्वतता याला प्राधान्य देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. पुण्यातील माहिती तंत्रज्ञान उद्योगातील जबाबदार व्यवसाय पद्धतींसाठी आम्ही एक नवीन आदर्श स्थापित करू अशी आम्हाला आशा आहे."

कामाच्या ठिकाणी जाताना आणि तिकडून येताना पारंपरिक साधनांनी होणाऱ्या प्रवासामुळे येणारा मानसिक आणि शारीरिक ताण ओळखून सायबेज शेवटच्या मैलाला मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या आव्हानाचा सामना करत आहे. यावर उपाययोजना म्हणून कंपनीने समर्पित शटल सेवा सादर केल्या आहेत. तसेच येणाऱ्या काळात या सेवेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. या सर्वसमावेशक पद्धतीने विना त्रास प्रवासाचा पाया घातला आहे. तसेच तणाव, थकवा आणि अपघाताचा धोकादेखील कमी केला आहे.

सायबेज आणि पुणे मेट्रो यांच्यातील आताची भागीदारी माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी एक अनोखी संधी प्रदान करत आहे. सायबेज शाश्वत व्यवसाय पद्धतींसाठी एक नवीन आदर्श स्थापित करत आहे. या नावीन्यपूर्ण प्रवासात पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा देण्याची क्षमता आहे. यामुळेच पर्यावरणाप्रती जागरूक, संवेदनशील आणि कर्मचारी - केंद्रित उद्योग परिसंस्था सक्षम होईल. याशिवाय, पुणे मेट्रो मार्गांचे अखंड एकत्रीकरण सायबेज कर्मचाऱ्यांना आकर्षक संधी, अधिक कार्यक्षम आणि गतिमान कार्य वातावरणाचे आश्वासन देऊ शकेल.

पुणे मेट्रो मधेच पत्रकारांसोबत या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी सायबेजचे फाउंडेशनचे प्रमुख रितू नथानी, सायबेजचे अध्यक्ष गोपीकृष्णा कोंनानाथ, मुख्य अधिकारी जगतपाल सिंग, प्रसाद वाशिकर व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कल्याणी नगर मेट्रो स्टेशनला सायबेज नाव देण्यात आले...

सायबेज कंपनीबद्दल...
सायबेज गेल्या 28 वर्षांपासून डिजिटल प्रॉडक्ट इंजिनिअरिंग सेवा क्षेत्रातील सातत्याने उत्कृष्ट कार्येतिहास असणारी दिग्गज कंपनी आहे. सायबेज जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानात्मक नेतृत्व करणाऱ्या व्यवसायांना सर्वात व्यापक आणि विवेकपूर्ण सेवा देते. सायबेजच्या पुरस्कारप्राप्त सेवांमध्ये सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट लाईफ सायकल - पीएलसी आणि उत्पादन सुधारणेचा समावेश होतो. सायबेज आपल्या कर्मचाऱ्यांप्रती निष्पक्षता सुनिश्चित करते आणि ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण उत्पादने व सेवांसाठी वचनबद्धता व्यक्त करते.

Post a Comment

0 Comments