Type Here to Get Search Results !

शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या टोळीचा येरवडा पोलिसांनी केला पर्दाफाश ; आरोपींना केले जेरबंद...

शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या टोळीचा येरवडा पोलिसांनी केला पर्दाफाश ; आरोपींना केले जेरबंद...


पुणे :- दि. ०४/०३/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोहवा अमजद शेख, तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओंकार सुपर मार्केट व हर्स हेरिटेज येरवडा येथे चोरी करणारे संशयीत आरोपी हे वाडिया बंगला नगर पुणे रोड व ब्रम्हासनसिटी वडगाव शेरी येथे उभे असल्याची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल पाटिल व अंमलदार पोहवा अमजद शेख, तुषार खराडे, कैलास डुकरे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे, विठ्ठल घुले यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना पकडले. त्यांना ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता १. तौसिफ बशीर शेख वय २५ वर्षे रा कोंढवा पुणे २. अमोल किसन अवचरे वय २८ वर्षे रा कासेवाडी भवानी पेठ पुणे ३. आजिम सलिम शेख वय २४ वर्षे रा कासेवाडी भवानीपेठ पुणे ४. प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे वय २४ वर्षे रा कासेवाडी भवानी पेठ पुणे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी येरवडा परिसरात चोरी केल्याने येरवडा पो स्टे गुरनं २७/२०२४ भादवि ४५७,३८० व गु र नं १०४/२०२४ भादवि ४५४, ४५७, ३८० हे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोर्पीना दि. ०४/०३/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. पोलीस कस्टडीमध्ये तपासादरम्यान त्यांनी स्वारगेट, कोंढवा परिसरात चोरी केल्याचे सांगितले. त्यावरुन संबंधित पोलीस स्टेशन अभिलेखावरील दुकानाचे शटर उचकटून केलेले खालील गुन्हे केल्याचे कबूल केल्याने उघडकीस आलेले आहेत.

सदर आरोपींकडून खालील एकूण ४ गुन्हे उघडकीस आलेले असून एकूण ७८.९००/- रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने त्यामध्ये ४.६ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे ३० कॉईन व सोन्याचे ३ कॉईन व ४१,५००/- रोख रक्कम, ९५३२/- रु किंमतीचे किराणा सामान, ३०,०००/- रु किंमतीची मोटारसायकल असा एकूण १,५९,९३२ रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

१. येरवडा पोलीस स्टेशन गु र नं २७/२०२४ भादवि ४५७,३८०

२. येरवडा पोलीस स्टेशन गु र नं १०४/२०२४ भादवि ४५४,४५७,३८०

३. कोंढवा पोलीस स्टेशन गु र नं २३४/२०२४ भादवि ४५७,३८०

४. स्वारगेट पोलीस स्टेशन गु र नं ८९/२०२४ भादवि ४५७,३८०

सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, संजय पाटील, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, संतोष पाटील, वपोनि येरवडा,  आशालता खापरे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments