सोलापूर रस्त्यावर अपघातात तरुणाचा मृत्यू...
पुणे : सोलापूर रस्त्यावरील हडपसर रामटेकडी भागात एका युवकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री १२.३० च्या सुमारास झाला. गणेश बेणेसूर ( वय वर्षे २३, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी पुणे ) असे त्याचे नाव असून हडपसर मधील एका कंपनीत तो कामाला होता.
सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी येत असताना बीआरटी च्या दुभाजकाला धडकून त्याला छातीला मार बसला, जवळच्या इस्पितळात नेत असताना त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या मागे आई वडील एका भाऊ असा परिवार आहे. हसतमुख मनमिळाऊ स्वभावाच्या गणेश च्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments