Type Here to Get Search Results !

"आरोग्यम" उपक्रम देणार पुणेकरांना आरोग्याविषयी जनजागृतीची मेजवानी ; पत्रकार परिषदेत साई बिझनेस क्लबच्या संस्थापक प्रा.डॉ. कृती वजीर यांची माहिती...

"आरोग्यम" उपक्रम देणार पुणेकरांना आरोग्याविषयी जनजागृतीची मेजवानी ; पत्रकार परिषदेत साई बिझनेस क्लबच्या संस्थापक प्रा.डॉ. कृती वजीर यांची माहिती...

पुणे :- आरोग्याविषयी जनजागृती करून घेण्याठी वाकड परिसरात असलेल्या हाॅटेल टीप-टाॅप इंटरनॅशनल येथे दि. ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी आयोजित आरोग्यम कार्यक्रम अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. हजारो पुणेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्याविषयी जनजागृती करून घेणार आहेत, अशी माहिती साई बिझनेस क्लबच्या उद्योजिका आणि संस्थापक प्रा.डॉ. कृती वजीर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला साई बिझनेस क्लब व कार्यक्रमाचे आयोजक उपस्थित होते.
डाॅ. कृती यांनी सांगितले की, पुणेकरांमध्ये आरोग्यासंबंधी जनजागृती करणे व त्यांना आरोग्यासंबंधी विविध विषयांचे ज्ञान प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. 
दोन दिवस सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत विविध आरोग्य सेवा उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात येणार आहे. शिवाय ४ फेब्रुवारी रोजी एक टॉक शो आणि वेद अभ्यास स्पर्धा होणार आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, आरोग्य सेवा उद्योगातील नामवंत तज्ञांचा समावेश असलेला आरोग्यम टॉक शो हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता दीपप्रज्वलनाने आणि उद्घाटन समारंभाने सत्र सुरू होईल, ज्यात सत्कार, आरोग्याशी संबंधित विषयावरील तज्ञांची भाषणे, मार्गदर्शन तबला शो सारखे सांस्कृतिक उपक्रम आणि बिझनेस कार्ड एक्सचेंजसह प्रश्नोत्तर फेरी यांचा समावेश आहे.
आरोग्यम स्वास्थ्य महोत्सवाचे उद्दिष्ट भारतीय व्यवसायांना समर्थन देण्यासाठी आणि लहान उद्योगांच्या वाढीला चालना देण्यासाठी विविध आरोग्य उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करून चांगले आरोग्य साजरे करणे आणि निरोगीपणा स्वीकारणे हे आहे. हा कार्यक्रम आरोग्य उद्योगातील लोकांना जोडण्यावर भर देतो, विशेषत: महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला आणि तरुणांना चांगले आरोग्य राखण्यासाठी शिक्षित करणे. याव्यतिरिक्त, आपल्या समृद्ध परंपरा जपण्यासाठी या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे घटक समाविष्ट केले जातात, असेही त्या म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments