भारत पंजाबी यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड...
टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- नवी दिल्ली येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि गुन्हेगारी नियंत्रण संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत HRCCO चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहित नवानी यांनी भारताचे राष्ट्रीय सचिव म्हणून पुण्यातील भारत पंजाबी यांची नियुक्ती केली आहे. पंजाबी यांनी मोहित नवानी यांचे आभार मानले आहेत आणि या संस्थेला नवीन उंची आणि नवीन आयामांवर नेण्याचे आश्वासन श्री नवानी यांना देऊन संस्थेसाठी त्यांनी केलेले समर्पण आणि कठोर परिश्रम यांची ग्वाही दिली आहे. यावेळी संस्थेतील वेगवेगळ्या राज्यातील मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments