Type Here to Get Search Results !

मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी पुस्तके वाचून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केल आपला नाव

मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी पुस्तके वाचून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केल आपला नाव...

पुणे : पुणे शहरात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने डिसेंबर महिन्यात पुणे बुक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी पुस्तक वाचन केल्याने त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली.

या कार्यक्रमामुळे आयोजकांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात आले. मात्र, आता या कार्यक्रमाच्या आयोजनात पुणे महापालिकेचा सहभाग असल्याने यासाठी 30 लाख रुपये पालिकेला द्यावे लागणार आहेत.

लहान मुले, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने पुण्यात १६ ते २४ डिसेंबर या कालावधी पुणे बुक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी महापालिकेला याचे सहप्रायोजक देखील करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ' स्टोरी टेलिंग गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते.

पुणे बुक फेस्टिव्हलचे समन्वयक म्हणून जबाबदारी असलेले राजेश पांडे हे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या संयोजनात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता. राज्य तसेच केंद्रातील काही व्यक्ती देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. त्यामुळे कार्यक्रमाला राजकीय रंग असल्याची चर्चा सुरू होती. हा कार्यक्रम भाजपने आयोजित केल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्यातच आता या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 30 लाख 37 हजार रुपये पालिकेला द्यावे लागणार आहेत. त्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला आहे.

हा कार्यक्रम अचानकपणे आयत्या वेळेस पालिकेला कळवण्यात आला होता त्यासाठी पालिकेने सहप्रयोजक व्हावे, असे सूचनाही राज्यस्तरावरून महापालिकेला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कार्यक्रमासाठी पालिकेच्या बजेटमध्ये तरतूद उपलब्ध नव्हती. परिणामी ही रक्कम वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आलेला आहे.


Post a Comment

0 Comments