पुण्यातील एलरोव पब आणि युनिकॉर्न पब वर आणि पुणे महापालिकेचे बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शिवप्रहारचे पुणे शहर अध्यक्ष अनिल बोटे यांचे पुणे मनपा बाहेर आमरण उपोषण...
काय लिहिलंय तक्रारी अर्जात...
सार्वजनिक चांधकाम विभाग अतिक्रमण विभाग पुणे शहर वरील विषयास अनुसुरून तक्रारी अर्ज देतो की कल्याणीनगर येथील दत्त मंदिर चौकात आयटी कंपनीच्या टेरेसवर रूफ टॉपवर एव व्यवसाय करण्यास बंदी आसताना तेथे अवैधपणे बांधकाम करुन या ठिकाणी पब रेस्टॉरंट एलरों व पब यूनिकॉर्न हाऊस नावाने हॉटेल एव उद्योग पहाटे पर्यंत चालवण्यात येत आहेत या संबंधित हॉटेल बाबत अनेक वेळा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी दिल्या आहेत व तसेच वृत्तपत्रांमध्ये ही जाहीरपणे छापून आल्या आहेत तरीही संबंधित हॉटेलवर कारवाई केली जात नाही या अनुषंगाने शासनाच्या महसूल ही बुडवला जात आहे. या सर्व अवैध धंद्याच्या दुर्लक्ष अधिकाऱ्यांकडून का केले जात आहे याचाही तपास केला पाहिजे. आणि संबंधित रेस्टॉरंट पब एलरो व पब यूनिकॉर्न हाऊस हे कल्याणीनगर दत्त मंदिर चौकातील आयटी कंपणीच्या टेरेसवरील अतिक्रमण विभागाने त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा आंदोलनाच्या स्वरुपातील तक्रारीचा ससेमिरा चालू करण्यात येईल. 10 दिवसाच्या आत कायदेशीर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवप्रहार संघटनेच्या वतीने दि. 05/02/2024 रोजी बेमुदत आमरण उपोषण आपल्या कार्यालयासमोर केले जाईल. असे पत्रात नमूद केले आहे.
Post a Comment
0 Comments