जेवण वाढताना झाली वाद पत्नीने केला पतीवर चाकूने वार भवानी पेठेतील घटना...
पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जया रमेश ससाणे (३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
त्यानंतर तिने जेवण वाढताना ताट आणि तांब्या आपटला. त्यामुळे रमेश यांनी पत्नीला चापट मारली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यातून जयाने पती रमेश यांचा दंड आणि पाठीवर चाकूने वार केले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार भाेसले करत आहेत.
Post a Comment
0 Comments