Type Here to Get Search Results !

Add

Add

डेक्कन क्वीन रिसर्वेशन डब्यात गर्दीच गर्दी आणि एमएसटी डबे मोकळेच ; वृद्धांना हाकलून लावल्याचे प्रकार ; रेल्वे प्रशासन घाबरते का पास धारकांना ?


डेक्कन क्वीन रिसर्वेशन डब्यात गर्दीच गर्दी आणि एमएसटी डबे मोकळेच ; वृद्धांना हाकलून लावल्याचे प्रकार ; रेल्वे प्रशासन घाबरते का पास धारकांना ?

पुणे :- हल्ली रेल्वेमध्ये गर्दी वाढत चालल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यातच पुण्या फोन सुटणारी आणि मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस मध्ये अतिशय लाजिरवाणी गोष्ट पाहायला मिळाली. त्यामध्ये रिझर्वेशन असलेले सगळ्या डब्यांमध्ये तुडुंब गर्दी असल्याचे पाहायला मिळाले. मात्र एम एस सी म्हणजेच पास धारकांच्या डब्यात अक्षरशः बसायचं सोडवा थांबायला देखील देत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र हे सांस्कृतिक राज्य म्हणून ओळखलं जाते परंतु माणुसकीला लाजिरवाणी घटना दररोज डेक्कन क्वीन मध्ये घडत असल्याचे घडत आहे. यांना रोज प्रवास करत असल्यामुळे यांची अक्षरशः दादा गिरी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

एक प्रसंग असा घडला की, एक वयोवृद्ध जोडपे त्या डब्यात थांबण्याची विनवणी करत होते परंतु अक्षरशः एमएसटी डबातील दररोज प्रवास करणारे काही गुंडांनी त्यांना दादागिरी करत त्यांना हाकलून लावल्याचे प्रकार समोर आले आहे.

नक्की यांना रेल्वे प्रशासन घाबरत का अशा प्रकारचं स्वरूप सध्या दिसत आहेत
अजून एक प्रकार असा घडला की एका व्यक्तीने विस्टा डोम या डब्याचे रिझर्वेशन केले होते त्यांनी अचानक गाडी धरली. D5 या डब्यामध्ये ते चढले होते त्यांचा डबा हा मागे असल्याकारणाने त्यांनी एम एस टी धारकांना दरवाजा उघडण्याकरिता सातत्याने विनवणी करत होते. त्यांच्याशी बोलून देखील त्यांनी दरवाजा न उघडण्याचा प्रकार केला आहे.
तसेच याबाबत यामध्ये असलेल्या टी सी यांना देखील कल्पना दिली असता, त्यांनी त्यावर काना डोळा केला असल्याचे निदर्शनास आले आहे.  

नागरिकांनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

यावर पुणे रेल्वे DRM तसेच रेल्वे प्रशासन काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments