पुणे :- पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाची बैठक घेत काल रात्री उशिरा बदली आदेश दिले आहेत. यापूर्वी 38 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक व बदलीचे ठिकाण खलील प्रमाणे (कोठून कुठे):-
१. दादासाहेब बाबुराव चुडाप्पा – वपोनि फरासखाना पोलीस ठाणे ते पोनि वाहतूक
२. सुनील बाबुराव माने – वपोनि खडक पोलीस ठाणे ते पोनि गुन्हे शाखा (T.A.W.)
३. रवींद्र मनोहर गायकवाड – वपोनि विश्रामबाग पोलीस ठाणे ते वपोनि खडक पोलीस ठाणे
४. दीपाली सचिन भुजबळ – गुन्हे शाखा ते वपोनि उत्तमनगर (बदली आदेशाधिन) ते वपोनि विश्रामबाग पोलीस ठाणे
५. हेमंत चंद्रकांत पाटील – वपोनि कोथरूड पोलीस ठाणे ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा
६. संदीप नारायण देशमाने – वपोनि अलंकार पोलीस ठाणे ते वपोनि कोथरूड पोलीस ठाणे
७. सुनील पांडुरंग जैतापूरकर – वपोनि वारजे माळवाडी पोलीस ठाणे ते कोर्ट कंपनी
८. अभय चंद्रनाथ महाजन – वपोनि सिंहगड रोड पोलीस ठाणे ते पोनि आर्थिक गुन्हे शाखा
९. विजय गणपतराव कुंभार – पोनि गुन्हे शाखा (अभियोग) ते वपोनि सिंहगड रोड पोलीस ठाणे
१०. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे – वपोनि खडकी पोलीस ठाणे ते पोनि विशेष शाखा
११. गिरीश विश्वासराव दिघावकर – पोनि गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस ठाणे ते वपोनि खडकी पोलीस ठाणे
१२. बालाजी अंगदराव पांढरे – वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे ते पोनि गुन्हे शाखा युनिट-३
१३ नीलिमा नितीन पवार – वपोनि कोरेगाव पार्क ते वाहतूक शाखा (बदली आदेशाधिन) ते पोनि विशेष शाखा
१४. अश्विनी अनिल सातपुते – पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ते वपोनि कोरेगाव पार्क पोलीस ठाणे
१५. नीलम शशिकांत भगत – पोनि आर्थिक गुन्हे शाखा ते पोनि कोर्ट आवार
१६. श्रीहरी रामचंद्र बहिरट – पोनि गुन्हे शाखा युनिट-३ ते पोनि गुन्हे शाखा (अभियोग)
१७. राजेंद्र शावरसिद्ध लांडगे – पोनि नियंत्रण कक्ष ते पोनि गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक - १
असे बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
Post a Comment
0 Comments