Type Here to Get Search Results !

टाटा पॉवरने मुंबईचा उत्साह साजरा करण्यासाठी प्रथमच "मुंबई फेस्टिव्हल 2024" सह केली भागीदारी...

टाटा पॉवरने मुंबईचा उत्साह साजरा करण्यासाठी प्रथमच "मुंबई फेस्टिव्हल 2024" सह केली भागीदारी...

मुंबई, (मुज्जम्मील शेख) :-  टाटा पॉवर ही भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. कंपनी मुंबईतील ४.५ लाख ग्राहकांना विश्वासार्ह आणि परवडणारी वीज पुरवठा करते. टाटा पॉवरने पहिल्या-वहिल्या मुंबई फेस्टिव्हल 2024 सोबत 'मुंबई पार्टनर भागीदारी घोषित केली. ज्या शहराला कंपनी १०० वर्षाहून अधिक काळापासून बीज पुरवठा करते, त्या शहराच्या प्रती सन्मानासाठी ही भागीदारी केली आहे.

शहरातील विविध विभागांमधो 30,000 हून अधिक हरित ग्राहकांसह, ही भागीदारी टाटा पॉवरच्या "आलिंगन, प्रेम आणि स्विच' या शक्तिशाली संदेशाद्वारे मुंबईतील नागरिकांमध्ये पर्यावरणीय जाणीव आणि शाश्वत जीवनाची भावনা वाढविण्याच्या समर्पणाला बळकटी देते.

मुंबई महोत्सव हा शहरातील समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा उत्सव असून, २० ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबईतील विविध प्रतिष्ठित ठिकाणी हा महोत्सव होणार आहे. यामध्ये कंपनीने नुकत्याच सुरु केलेल्या "#DuniyaApneHawale' आणि '#SustainablelsAttainable' या मोहिमेची वैशिष्ट्ये मांडण्यात येणार आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून, आयकॉनिक सस्टेनेबिलिटी चॅम्पियन आणि कुसेडर ऑफ चेंज, 'ग्लोबी', शहरातील महत्वाच्या ठिकाणी मुंबईकरांचे स्वागत करणार आहे. 'हग द ग्लोबी' हा उपक्रम अभ्यागतांना आनंदी करण्यासाठी डिङ्गइन केलेला आहे. त्याद्वारे हरित ऊर्जा स्वीकारण्याची आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात पर्यावरण अनुकूल पद्धतींचा समावेश करण्याची वचनबद्धता पातून दिसून येते.

टाटा पॉवर या महोत्सवादरम्यान मोफत RFID इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) चार्जिंग कार्ड देणार आहे. हा उपक्रम इलेक्ट्रिक बाहनांचा अवलंब करण्यास आणि वाहतुकीच्या स्वच्छ, अधिक शाश्वत पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी टाटा पॉवरने केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करतो. आजपर्यंत, टाटा पॉवरने मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणी ८०० सार्वजनिक आणि अर्ध-सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन उभे केले आहेत.

उत्सवाच्या भावनेला चालना देत टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ. प्रवीर सिन्हा म्हणाले की, "सिटी ऑफ ड्रीम्स'चा एक महत्त्वाचा उत्सव असलेल्या पहिल्या-वहिल्या मुंबई फेस्टिव्हलगी स्वतःला जोडून घेण्याचा टाटा पॉवरला अभिमान आहे. शंभर वर्षाहून अधिक काळ शहराला ऊर्जा देणारी कंपनी म्हणून, शहराला स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे उपाम स्वीकारताना पाहून आम्हाला आनंद होत आहे. हा महोत्सव मुंबईकरांसाठी #SustainablelsAttainable चळवळीला पुढे नेण्याची आणि पर्यावरणाबाबत जागरूक राहण्याची संधी आहे."

टाटा पॉवर मुंबईत शाश्वततेसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. याचे उदाहरण अनेक प्रभावी उपक्रमांनी दिले आहे. कंपनीला मुंबईत ३० हजारांहून अधिक हरित ग्राहक असण्याचा अभिमान वाटतो आणि कंपनी आपल्या ग्राहकांमध्ये हरित ऊर्जेचा अवलंब करण्यास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. कंपनीने मुंबईतील ८८% पेक्षा जास्त ग्राहकांना त्यांच्या मासिक बीज बिलांसाठी डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडण्यासाठी यशस्वीरित्या प्रोत्साहित केले आहे आणि ६०% पेक्षा जास्त लोकांनी ई-बिल स्वीकारले आहेत, या बदलामुळे केवळ कार्बन फुटप्रिंटमध्ये लक्षणीय घट दिसत नाही तर अंदाजे ४८ लाख कागदपत्रांची वार्षिक बचत देखील होते. ग्रीन टेरिफ, स्मार्ट मीटरिंग आणि होम ऑटोमेशन यासह विविध शाश्वतउपक्रमांची अंमलबजावणी, ग्राहकांना ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनासाठी प्रेरित करण्यास्ठी कंपनीची वचनबद्धता दर्शवते.

अलीकडेच, कंपनीने मुंबईकरांना ग्रीन सोल्यूशन्स आणि उत्पादने निवडण्यासाठी आणि पर्यावरणासाठी जीवनशैली (LIFE) साठी वचनबद्ध करण्यासाठी संदेशांसह फीडर पिलर्सचे री-ब्रडिंग केले आहे. चमकदार केशरी आणि हिरव्या रंगांसह हे अस्पष्ट कॅबिनेट नजरेतून सुटणे कठीण आहे आणि उत्साही लोकांसाठी सेल्फी पॉइंट बनले आहेत. पुढील काही महिन्यांत, टाटा पॉवरने शहरातील सर्व ५ हजार फीडर पिलरवर या अर्थपूर्ण आणि रंगीत संदेशाची प्रतिकृती बनवण्याची योजना आखली आहे

टाटा पॉवरचे मुंबई फेस्टिव्हलसोबतचे सहकार्य हे शाश्वततेसाठीच्या त्याच्या चिरस्थायी समर्पणाचा पुरावा आहे. अनेक उपक्रम आणि धोरणात्मक भागीदारीद्वारे मुंबईला हरित आणि स्मार्ट शहरात बदलण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. गुणवत्ता, मुरक्षितता, ग्राहकांचे समाधान आणि नैतिक व्यवसाय पद्धतींवर लक्ष केंद्रित करून टाटा पॉवर हे शतकातून अधिक काळ मुंबईला ऊर्जा प्रदान करण्यात एक विश्वासार्ह नाव आहे.

Post a Comment

0 Comments